नालासोपाऱ्यात गाव गुडांकडून तरुणाला बेदम मारहाण; CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – नालासोपाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये काही गावगुंडांनी तरुणाला बेदम मारहाण (brutally beaten) केली आहे. हि संपूर्ण मारहाणीची (brutally beaten) घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे या गाव गुंडांच्या टोळीत एका महिलेचादेखील समावेश होता.अमन पासवान असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वमधील धानीवबाग परिसरातील रहिवाशी आहे. या मारहाणीमध्ये (brutally beaten) अमन पासवान याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
अमन पासवान हा तरुण नालासोपारा पूर्वमधील धानीवबाग परिसरात राहतो. तो इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार भंगार विकण्यावरून त्याचे दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवत त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हि संपूर्ण मारहाणीची (brutally beaten) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या मारहाणीप्रकरणी (brutally beaten) पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सात जणांपैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!