मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; आधी अश्लील हावभाव अन् नंतर….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई मध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका 24 वर्षीय युवतीवर धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) अश्लील हावभाव आणि विनयभंग (Molesting) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसानी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा मुंबईत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 जून रोजी एक 24 वर्षीय महिला चर्नी रोड स्थानकावर चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. ती ग्रँट रोड स्थानकाजवळ आली असता, एक अज्ञात व्यक्ती डब्यात घुसला आणि त्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. तसेच काही अश्लील भाषाही वापरली यानंतर ५ दिवसांनी म्हणजेच बुधवारी या महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.

याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 354-A (लैंगिक छळ) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे मायानगरी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहीला आहे.