दादर रेल्वे स्टेशन हादरल! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर रोज प्रवाशांची लगबग सुरू असते. कामाला जाण्यासाठी रोज हजारो प्रवासी या दादर स्टेशनवरून ये जा करत असतात. आज याच दादर रेल्वे स्टेशनवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकण्यात आले आहे. सुदैवाने ही तरुणी सुखरूप असून सध्या तिची या घडलेल्या प्रकाराबाबत विचारपूस करण्यात येत आहे. मात्र ज्यावेळी हा सर्व प्रकार घडला तेव्हा रेल्वे स्टेशनवर खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली.पीडीत तरुणीचे वय 29 वर्षे असून ती पुण्याहून मुंबईकडे येणा-या उद्यान एक्सप्रेसमधलील लेडीज डब्यातून प्रवास करीत होती. याच लेडीज डब्यातून तीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, या पिढीत तरुणीवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने त्यांनी तिला धावत्या ट्रेन मधून फेकून दिले. ही घटना 6 ऑगस्ट रोजी सुमारे रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. मात्र हा सर्व प्रकार आज उघडकीस आला आहे.याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले आहे की, सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळच्यावेळी दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उद्यान एक्सप्रेस आल्यानंतर लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर संबंधित तरुणी एकटीच लेडीज डब्यात राहिली होती. या एकट्या तरुणीलाच पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी संबंधित तरुणी आणि हल्लेखोरामध्ये हातपायी झाली. हल्लेखोराला प्रतिकार करतानाच हल्लेखोराने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॉर्मवरच पडल्यामुळे जखमी होऊन बेशुद्ध पडली.

यानंतर या तरुणीला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. त्यावेळेस तिने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मुख्य म्हणजे या सर्व घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील मुंबई लोकलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात महिला एकटीच पाहून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा, प्रयत्न लुटमार करण्याचा प्रयत्न, चोरीचे प्रकार अशा घटना समोर आल्या आहेत. मुंबई लोकलने कित्येक महिला रोज रात्रीच्या वेळी प्रवास करीत असतात. मात्र त्यांच्या सुरक्षितेबाबत प्रशासन काही ठोस पावले उचलताना दिसत नाही.