AAI Bharti 2024 | तुम्ही जर कोणत्याही विषयातील पदवी घेतली असेल, तर ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण यानंतर तुमच्या करिअरला एक वेगळे वळण नक्कीच मिळणार आहे. कारण आज आम्ही पदवीधरांसाठी एक नोकरीची खूप चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एअरपोर्ट ऑथेरिटी ऑफ इंडिया (AAI)कडून बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. यावर्षी ही महाभरती निघालेली आहे. कारण या अंतर्गत यावर्षी तब्बल 490 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीची अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे. या भरतीसाठी 2 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 1 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता आपण या भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | AAI Bharti 2024
पदाचे नाव
या भरती अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी या पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
पदसंख्या
यावर्षी मेगा भरती निघालेली आहे. त्यामुळे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून तब्बल 490 रिक्त जागांची भरती केली जाणार.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुमचे वय 27 वर्षे असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
महत्त्वाच्या तारखा | AAI Bharti 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख – 2 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024.
मासिक पगार
या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला 40 हजार ते 1 लाख 40 हजार एवढा पगार मिळेल.
रिक्त पदांचा तपशील
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह सिविल – 90 जागा
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रिकल -106 जागा
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स – 278 जागा
- जूनियर एक्झिक्यूटिव्ह आयटी – 13 जागा
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह आर्किटेक्चर – 3 जागा
शैक्षणिक पात्रता
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह सिविल – B. Tech in civil
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रिकल – B. Tech in Electtical
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स – B. Tech in ECE
- जूनियर एक्झिक्यूटिव्ह आयटी – B. Tech in CE/ IT
- ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह आर्किटेक्चर – B. Tech in Arch
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा