Monday, January 30, 2023

दिल्लीत महापालिकेच्या शपथविधी सोहळ्यात राडा; आप-भाजप नगरसेवक भिडले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत महापालिकेत आपच्या नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात जोरदार राडा झाला असून आप आणि भाजप पक्षातील नगरसेवक एकमेकात भिडले असून जोरदार बाचाबाची झाली आहे.

दिल्ली महापालिकेत असलेली भाजपची सत्ता आपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवत हिरावून घेतली. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर आज आपचा शपथविधी सोहळा पार पडणार होता. दरम्यान, स्वीकृत सदस्यत्वाच्या मुद्यांवरून जोरदार राडा सुरु झाला. या ठिकाणी भाजप आणि आपच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या अंगावर जात धक्काबुक्कीही केली.

- Advertisement -

अचानकपणे सुरु झालेल्या राड्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडून गेला असून पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्र्यत्न केला जात आहे. मात्र, दोन्हीही पक्षातील सदस्यांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे. सध्या आया ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.