राज्यासह जिल्हाभरात आम आदमी पार्टी करणार केंद्र सरकारचा निषेध; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्रातील भाजप सरकारने नाकारला आहे. तसेच नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने रविवारी (दि. 11) राज्यासह जिल्ह्यात एकाचवेळी निषेध करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दि. 11 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा, महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर संविधानिक मार्गाने केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत. महानगरातील निषेध आंदोलनात किमान 1 हजार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल ईटालिया यांनी केल्या आहेत.

आम आदमी पार्टीने राज्यभरातील 7 जिल्ह्यांमध्ये नुकतीच स्वराज्य यात्रा काढली. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे आम आदमी पार्टीला मतदान केल्यास महाराष्ट्र राज्यात काय बदल होऊ शकतो हे पटवून देणे हा स्वराज्य यात्रेचा मुख्य मुख्य उद्देश होता. यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने काम केले जात आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे.