Aare Ware Beach Ganapatipule | आपल्या महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत. जी पाहिल्यावर आपण अगदी मंत्रमुग्ध होतो. आणि अनेक लोक लांबून महाराष्ट्रात भेट देण्यासाठी येतात. कारण महाराष्ट्राला अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाण आहे. अशातच कोकण हा आपल्या महाराष्ट्राचा स्वर्ग मानला जातो. कोकण जितके सुंदर तितकाच इथला प्रवास देखील सुंदर आहे. चारही बाजूने कोकणाला समुद्राने वेढलेले आहे. तसेच उंच उंच सुपारीची झाडे, मंत्रमुग्ध करणारे वातावरण यामुळे सगळ्यांनाच कोकण हवाहवासा वाटतो. जर तुम्ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी मार्गाने जात असाल, तर यावर एक सुंदर असे वळण आहे. आणि त्यावर एक अथांग समुद्र दिसतो. जो पाहिल्यावर तुम्हाला खूप छान वाटेल. आता हा सागरी मार्ग नक्की कुठे आहे? याची माहिती आपण जाणून घेऊया.
कोकणात जाताना सागरी मार्गाचा आनंद घेणे, ही एक खूप मोठी अनुभूती असते. अशातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका डोंगराच्या दोन बाजूला हे समुद्र दिसतात. हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जातो. हे दृश्य पाहायला सगळ्यांनाच आवडते. तुम्ही जर आरे वारे (Aare Ware Beach Ganapatipule) रोडने प्रवास करत असाल, तर या प्रवासादरम्यान हे नयनरम्य दृश्य वाटते की, हा प्रवास कधी संपू नये असे तुम्हाला वाटेल.
या समुद्र मार्गावरून जाताना तुम्हाला डोंगराच्या माथ्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या सगळे सुंदर असे दृश्य पाहायला मिळेल. तसेच चमचमीत पांढरी वाळू, हिरवीगार झाडे, आकाश, आकाशात उडणारे अनेक पक्षी तुम्हाला पाहायला मिळेल. या डोंगराच्या दोन्ही बाजूंना समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जातो.
आरे आणि वारे हे दोन समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूला आहेत. यावेळी अरबी समुद्रात ही डोंगराची कड प्रवेश करत आहे. आणि त्या समुद्रकिनाऱ्यांना विभाजित करते. त्यामुळे या डोंगर माथ्यावर दोन्ही बाजूला समुद्र पाहायला मिळतो. आरे आणि वारे या दोन गावांजवळ हे दोन समुद्रकिनारे आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांना देखील आरे आणि वारे ही नाव पडलेली आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने गणपतीपुळे येथे जाणारा सागरी मार्ग आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला खूप चांगले दृश्य पाहायला मिळेल. कोकणातील सगळ्यात पर्यटन लोकप्रिय असलेले पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे जाताना हा सुंदर सागरी मार्ग तुम्हाला लागतो. यावर तुम्हाला खूप अद्भुत अशी अनुभूती येईल.