Aastha Train Ayodhya : अयोध्येसाठी कोकणातून धावणार ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Aastha Train Ayodhya : २२ जानेवारी २०२३ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा पार पडल्यानंतर आता देशभरातून राम भक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे जात आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन IRCTC मार्फत भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी देशभरातील एकूण ६६ रेल्वे स्थानकाहून अयोध्येसाठी खास अशी आस्था ट्रेन चालवण्यात येणार आहे. यामध्ये कोकणाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आरामात अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. ही ट्रेन नेमकी कधीपासून सुरु होणार आणि ती कोणकोणत्या स्थानकांवर थांबेल हे आज आपण जाणून घेऊयात….

कुठून आणि कशी धावणार आस्था ट्रेन – Aastha Train Ayodhya

कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली ट्रेन १२ फेब्रुवारीला गोव्यातील वास्को जंक्शनवरून सुटणार आहे. त्यादिवशी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन अयोध्येसाठी निघेल. त्यानंतर मजोरडा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड या स्थानकांवर ही आस्था ट्रेन थांबा घेईल आणि देशातील अयोध्येकडे रवाना होईल. या रेल्वेत २२ कोच असतील आणि २,७९१ किलोमीटरचा प्रवास असेल. या आस्था रेल्वे मुळे (Aastha Train Ayodhya) गोवा आणि महाराष्ट्रातील भाविकांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशभरातील तब्बल ८००० हुन अधिक दिग्गज आणि लाखो रामभक्तांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. यानंतर संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला जात आहेत. २२ तारखेनंतर ते आजपर्यंत दररोज मंदिर परिसर भाविकांनी भरलेला दिसतो. त्याबाबतचे विडिओ सुद्धा अनेकदा समोर आले आहेत. राम मंदिराच्या उभारणीमुळे उत्तरप्रदेश सरकारला सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे आणि उत्तरप्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.