विराट कोहली घेणार निवृत्ती?? नव्या दाव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा खऱ्या अर्थाने संघाचा कणा आहे. विराट जेव्हा जेव्हा मोठी खेळी खेळतो तेव्हा तेव्हा भारताचा संघ विजयी होतोच. आत्तापर्यंत कोहलीने अनेकदा ऐतिहासिक खेळ्या करून भारताचा अश्यक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे विराट खेळत राहो आणि भारत जिंकत राहो असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटतं. मात्र नुकतंच विराट कोहलीचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलिअर्स (AB De Villiers) याच्या एका दाव्याने कोहलीच्या चाहत्यांच्या पोटात गोळा येऊ शकतो. पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट निवृत्त होईल असं डिव्हिलिअर्सने म्हंटल आहे.

काय म्हणाला ए.बी. डिव्हिलियर्स- 

ए. बी.डिव्हिलियर्स ने आपल्या यूट्यूब चैनल वर  केलेल्या एका  व्हिडिओ दरम्यान म्हंटल की, 2023 नंतरचा वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकेत 2027 मध्ये खेळला जाईल. त्यासाठी बराच  कालावधी  जाईल. त्यामुळे पुढचा  वर्ल्ड कप विराट कोहली खेळेल याबद्दल मला शाश्वत्ती वाटत  नाही. भारत यंदाचा म्हणजेच 2023 चा वर्ल्ड कप जिंकण्याची  शक्यता अधिक आहे. जर भारत यंदाचा हा वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरला तर विराट कोहली ह्या घटनेला उत्तम संधी समजून आपल्या निवृत्तीची घोषणा करू शकतो .

दरम्यान, विराट कोहलीचे क्रिकेट विश्वातील स्थान खुपच उंच आहे. कोहलीने आत्तापर्यंत 279 वनडे मॅचेस मधून 13027 रन बनवल्या आहेत. यामध्ये 47 शतके आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. अंडर 19 क्रिकेटसह आजपर्यंत कोहलीने भारतीय क्रिकेटला भरभरून दिले आहे. त्यामुळे जर कोहली निवृत्त झाला तर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का असेल.