Abba Cow Sold For 40 Crores | अबब ! तब्बल 40 कोटी रुपयांना झाली ‘या’ गायीची विक्री, काय आहे खासियत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Abba Cow Sold For 40 Crores | अनेक शेतकरी हे त्यांच्या शेतीला जोडून जोडव्यवसाय म्हणून गाईंचे पालन करतात. आजकाल गाईंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जर एका सामान्य माणसाला विचारले की, एका महागड्या गाईची किंमत किती असेल? तर तो व्यक्ती म्हणेल 5 लाख किंवा जास्तीत जास्त 10 लाख. परंतु अशी एक गाय आहे, ज्या गाईची किंमत तब्बल 40 कोटी एवढी आहे. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल की, एखाद्या गायीची किंमत 40 कोटी रुपये (Abba Cow Sold For 40 Crores) कशी असू शकते? तर आज त्याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत.

प्राण्यांच्या लिलावात झाला विक्रम

या गाईची विक्री (Abba Cow Sold For 40 Crores) ही प्राण्यांच्या लिलावातील सगळ्यात मोठी विक्री मानली गेली आहे. ही गाय आंध्रप्रदेशमधील नेल्लोर येथील आहे. तिला व्हीएटीना 19 एफआयव्ही मारा इमोव्हीस या नावाने ओळखले जाते. ब्राझीलमध्ये प्राण्यांचा एक लिलाव झाला आणि या लिलावात या गाईची किंमत 4.8 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी बोली लागली होती. म्हणजेच भारतीय रुपयांनुसार ही किंमत 40 कोटी एवढी आहे. आतापर्यंत विकल्या गेलेल्या सगळ्यात महागड्या गाईपैकी ही एक गाय आहे. रेशमी पांढरा रंग आणि खांद्यावर विशिष्ट बल्बस कुबड असलेली ही गाय मुळची भारतातील आहे.

ब्राझीलमध्ये या गायीला मोठी मागणी | Abba Cow Sold For 40 Crores

या गाईचे नाव वेगळे असले तरी या गाईचे नाव हेल्लोरा जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. ब्राझीलमध्ये या गाईच्या जातीला मोठी मागणी आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या गाईच्या जातीला बोस इंडिकस असे म्हणतात. ही गाय भारतातील ओंगोले या गुरांची वंशज आहे आणि तिच्यामध्ये खूप जास्त ताकद असते.

या गाईच्या प्रजाती 1968 मध्ये जहाजाने पहिल्यांदाच ब्राझीलमध्ये पाठवण्यात आलेली होती. 1960 च्या दशकात यासारख्या आणखी काही गाई देखील पाठवल्या होत्या. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे या गाई अतिशय उष्ण तापमान देखील अगदी सहजरीत्या राहू शकतात. त्यांची चयापचय करण्याची क्रिया देखील खूप चांगली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग देखील होत नाही. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे तिथल्या वातावरणासाठी ही गाय अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये ही गाय मोठ्या प्रमाणात विकत घेतात.