हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त अरब अमिरात (यूएई) मधील अबुधाबी हे सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. ‘नंबीओ’ ऑनलाइन डेटाबेसने जारी केलेल्या 2025 च्या सुरक्षा रैंकिंगमध्ये अबुधाबीने (Abu Dhabi) या अव्वल स्थानाची धुरा कायम ठेवली आहे. यापाठोपाठ यूएईतील दुबई, शारजा आणि रस अल खैमाह या शहरांनी अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर स्थान मिळवले आहे. तसेच, तैवानची राजधानी तैपेई पाचव्या स्थानावर आहे. या यादीत भारतातील 19 शहरे समाविष्ट असून , मंगळुरू हे भारतातील पहिलं शहर बनले आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
भारतातील 19 शहरे या रँकिंगमध्ये –
या रँकिंगमध्ये यूएईतील चार शहरांचा समावेश आहे, ज्यामुळे यूएईला सुरक्षिततेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर, भारतातील 19 शहरे या रँकिंगमध्ये समाविष्ट झाली आहेत. यातील मंगळुरू हे भारतातील पहिलं शहर असून, जागतिक स्तरावर 48 व्या स्थानावर आहे. यापाठोपाठ वडोदरा (85), अहमदाबाद (90), सुरत (105), जयपूर (115), नवी मुंबई (124), तिरुवनंतपुरम (145), चेन्नई (151), पुणे (162), हैदराबाद (173), चंदीगड (174), मुंबई (183), कोलकाता (205), इंदौर (226), गुडगाव (266), बंगळुरू (273), नोएडा (281), गाझियाबाद (308), दिल्ली (309) अशी शहरे यादीत आहेत.
रँकिंगमध्ये इतर देश –
रँकिंगमध्ये पाकिस्तानी शहरांमध्ये इस्लामाबाद (93), लाहौर (131), रावळपिंडी (249) आणि कराची (299) यांचा समावेश आहे. अमेरिकेतील 44, ब्रिटनमधील 18 आणि चीनमधील 5 शहरे यादीत आहेत.
सर्वात असुरक्षित शहरांची यादी –
रँकिंगमध्ये सर्वात खाली म्हणजेच 382 व्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिझबर्ग हे शहर आहे. यापूर्वी प्रिटोरिया (381), व्हेनेझुएलातील काराकस (380), पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी (379) आणि जोहन्सबर्ग (378) यांचा समावेश आहे, जे या यादीतील सर्वात असुरक्षित शहरांमध्ये समाविष्ट आहेत.