हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (AC Blast) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात, ऑफिसमध्ये, कार्यलयांमध्ये एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असते आणि अशावेळी एसीची थंडगार हवा हवीहवीशी वाटू लागते. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात घरात एसी बसवून घेतात. चोवीस तास एसीचा वापर करून गरमीपासून सुटका मिळवतात.
दरम्यान, ३० मे २०२४ रोजी नोएडा हाऊसिंग सोसायटीमध्ये एसीच्या इनडोअर युनिटमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नव्हे तर मध्यंतरीच्या काळात अशी अनेक प्रकरणे नोंद केल्याचे समोर आले आहे. यावरून समजतंय की, वाढत्या तापमानामुळे एसीमध्ये स्फोट होऊ शकतो. याबाबत तज्ञांनी अधिक सांगताना नेमके या घटनांचे मूळ कारण काय? आणि कशी खबरदारी घ्यावी? याची माहिती दिली आहे.
AC मध्ये स्फोट होण्याची कारणे
(AC Blast)
विद्युत उपकरणांचा सतत वापर
उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात प्रचंड उष्णता वाढलेली असते. अशा वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकरणांचा सतत वापर केला जातो. ज्यामुळे या उपकरणांवर ताण येतो. (AC Blast) सतत वापरल्यामुळे विद्युत उपकरणे अधिक गरम होतात आणि यामध्ये स्फोट होण्याची शक्यता वाढते.
विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने जाणे
आणखी एक कारण सांगायचे तर, शॉर्ट सर्किट किंवा जेव्हा सर्किटमधील विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने जातो तेव्हादेखील आग लागण्याची शक्यता असते. शॉर्ट सर्किट झाल्यास कायम धोकादायक परिस्थिती उद्भवते असे नाही. मात्र, जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असतो आणि तेव्हा शॉर्ट सर्किट झाले तर मात्र विद्युत प्रवाहित करणाऱ्या तारा वितळून मोठी आग लागू शकते. (AC Blast)
मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये दोष
तज्ञांच्या भाषेत सांगायचे तर, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मिनिएचर सर्किट ब्रेकर्स अर्थात एमसीबी बसवलेले असते. त्यामुळे विद्युत उपकरणांचा अधिक वापर झाल्यावर त्यावर जो ताण येतो त्याचा सर्किटला सिग्नल मिळतो. एका इलेक्ट्रिक कंपनीने म्हटल्याप्रमाणे, ‘मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये बीमेटलीक स्ट्रिप म्हणजेच दोन धातूंनी तयार झालेल्या पट्ट्या. इलेक्ट्रिक सर्किटमधून जास्त प्रमाणात विद्युतप्रवाह वाहत असल्यास एमसीबी बीमेटलीक स्ट्रिप गरम होतात. ज्यामुळे त्या आपली जागा सोडू शकतात. अशावेळी मिनिएचर सर्किट ब्रेकर्सवर दिलेले बटण बंद होते आणि सर्किट डिस्कनेक्ट होते.
(AC Blast) ज्यामुळे विद्युत प्रवाह थांबतो. मात्र, त्यानंतर बटण चालू करून पुन्हा विजेचा प्रवाह सामान्यपणे सुरू केला जाऊ शकतो’. दरम्यान बऱ्याचदा, मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये दोष असण्याची शक्यता असते. ज्यामुळे ही यंत्रणा अपयशी ठरते आणि परिणामी आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते.
चांगल्या क्वालिटीची उपकरणे न वापरणे (AC Blast)
याशिवाय विद्युत उपकरणांचा सर्वाधिक वापर, ओव्हरलोडिंग, चांगल्या क्वालिटीची उपकरणे न वापरणे यामुळे देखील अशा घटना घडू शकतात.
‘या’ गोष्टी महत्वाच्या
1. जर तुमच्या घरात स्प्लिट एसी असेल तर त्याबाबत आगीच्या संभाव्य धोक्यांसाठी आतील आणि बाहेरील दोन्ही युनिट्सकडे नीट लक्ष द्या. या एसीच्या इनसाइड युनिटमध्ये बाष्पीभवन, ब्लोअर आणि फिल्टर नेट्स असतात. तर आउटसाईड युनिटमध्ये कॉम्प्रेसरचा समावेश असतो. जो आपल्या घरात वाहणारी हवा थंड करण्यास मदत करतो. (AC Blast) या दोन्ही युनिटची वेळोवेळ सर्व्हिसिंग करून घ्या.
2. एसीच्या मॅन्युअलमध्ये लिहिल्याप्रमाणे, इनडोअर आणि आउटडोअर वायरिंग कनेक्शन सुरक्षित असेल याची काळजी घ्या. त्याच्या वायर योग्यरित्या लावून घ्या. म्हणजे कनेक्शन टर्मिनल्समधून वायर ओढले जाणार नाही आणि कनेक्शन नीट नसल्यामुळे उष्णता निर्माण होऊन आग लागणार नाही.
3. सर्किट ब्रेकर आणि फ्यूज चांगल्या स्थितीचे असावेत. (AC Blast) एसीच्या सेटअपमध्ये कोणतेही बदल किंवा अधिकृत दुरुस्ती ही सर्व्हिस सेंटरच्या मदतीने करावी. स्वतःहून कोणतेही प्रयोग करू नये.
4. इनडोअर युनिट पाण्याच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या.
5. बाहेरील युनिटच्या आजूबाजूला कचरा जमा होऊन देऊ नका. या कचर्यामुळे लहान प्राणी आकर्षित होतात आणि युनिटमध्ये प्रवेश करतात. ज्यामुळे युनिटमध्ये बिघाड होऊ शकतो आणि विजेच्या भागांशी त्यांचा संपर्क आल्यास आग लागू शकते.
6. एसी सतत चालू ठेवू नका. मुख्य पवरची बटणं काम झाल्यास आठवणीने बंद करा. (AC Blast)
7. कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरेंट गॅसची गळती तर होत नाही ना याची काळजी घ्या. यामुळेदेखील स्फोट होऊ शकतो.