AC Bus Stand : कूल…! कूल…! राज्यातील पहिले वाहिले AC बस स्थानक ‘या’ शहरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AC Bus Stand : राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यामध्ये रस्ते, उद्याने, यांचा समावेश आहे. एकीकडे पुण्यात होऊ घातलेल्या स्काय बसची जोरदार चर्चा असताना आता राज्यातील पहिल्या वहिल्या वातानुकूलित बस स्थानकाचे उदघाटन होणार आहे. हे बस स्थानक नक्की कुठे आहे ? ते कशा पद्धतीने विकसित केले आहे? याची सर्व माहिती जणून घेऊया…

नाशिक येथे हे पूर्ण बस स्थानक (AC Bus Stand) उदघाटनाच्या तयारीत आहे मेळा बस स्थानक नाशिक येथे आज (10 फेब्रुवारी) हा उदघाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

हे AC बस स्थानक 1.73 हेक्टर जमिनीवर बांधण्यात आले असून , या अत्याधुनिक सुविधामध्ये 6033.22 चौरस मीटरची प्रशस्त इमारतआहे. या अत्याधुनिक बसस्थानकाच्या (AC Bus Stand) लोकार्पण कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. या वातानुकुलीत बस स्थानकामुळे नाशिकच्या विकासाला हातभार लागणार आहे.

या बस स्थानकात एकूण 20 फलाट आहेत त्यापैकी 4 फलाट हे वातानुकूलित करण्यात आले आहेत. शिवाय प्रवासी आणि स्टाफ साठी देखील विशेष सोय करण्यात आली आहे. या बस स्थानकामध्ये चालक आणि वाहक महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आला आहे. शिवाय आपल्या लहान बाळाची काळजी नीट घेता यावी यासाठी हिरकणी कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. एसटी (AC Bus Stand) महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह देखील तयार करण्यात आला आहे. हे बस स्थानक आधुनिक आणि सोयीसुविधांनी युक्त असे बनवण्यात आले असून यामध्ये अपंगांना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. शिवाय अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह देखील तयार करण्यात आले आहे.

या बस स्थानकाच्या संपूर्ण परिसराचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यात आलेले (AC Bus Stand) आहे. नाशिकच्या या मेळा बस स्थानकामध्ये स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष आहे शिवाय नागरिकांना अल्पोपहार करता यावा यासाठी उपहारगृह, पार्सलची स्वतंत्र सोय सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. या अत्याधुनिक बस स्थानकामुळे नाशिकच्या लौकिकात मात्र वाढ होईल असा दावा नाशिक मध्य मतदार संघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.