एसटी बस आणि गॅस ट्रकचा भीषण अपघात : 18 प्रवाशी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

वाई – सातारा मार्गावर एसटी बस आणि गॅस ट्रक यांच्यामध्ये बावधन ओढ्यानजीक अपघात झाला. या अपघातात 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गॅस ट्रकचेही नुकसान झाले आहे. भारतगॅस कंपनीचा गॅस वाहतूक करणारा ट्रक आहे. अपघातामुळे वाई शहरात वाहनांची मोठी रांग लागलेली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साताऱ्याहून वाईला निघालेली एसटी बस आणि वाईहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या गॅसचा ट्रक यांचा अपघात बावधन ओढ्यानजिक झाला. अपघात झाल्यानंतर बसचा चालकासह बसमधील प्रवाशी जखमी झाले असून त्यांना लगेच वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघाताची माहिती वाई पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

वाई एसटी आगारप्रमुख गणेश कोळी हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयातही त्यांनी भेट देवून जखमी प्रवाशी व चालकाची चौकशी त्यांनी केली. या अपघाताची नोंद उशीरापर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.