पुणे- बंगळूर महामार्गावर कराडजवळ सहलीच्या बसला अपघात : विद्यार्थी व शिक्षक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे गावच्या हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची सहल कोकण दर्शन करण्यासाठी (दि. 16) जानेवारीला गेली होती. या सहलीत 5 एसटी बसेसमधून 200 विद्यार्थी व 15 शिक्षक सहभागी झाले होते. कोकण दर्शन करून सहल परतीच्या मार्गावर असताना मुंबई- गोवा महामार्गावर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जेवन करून सहल वाघोलीच्या दिशेला निघाली होती.
या दरम्यान, एसटी बस क्रमांक (एमएच- 14- एचजी- 8492) या बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या बसमध्ये 40 विद्यार्थी व काही शिक्षक होते. कराड ते सातारा लेन वरून जात असताना तासवडे गावच्या हद्दीत अपघात झाला.

पुढे चाललेला कंटेनर क्रमांक (एचआर- 67 बी- 2617) ला पाठीमागून एसटी बसने धडक दिली. एसटीची धडक भीषण असल्याने बसची क्लिनर बाजू काही अंतर फाटत गेली. यामध्ये माध्यमिकचे तीन विद्यार्थी व तीन शिक्षक जखमी झाले. अपघाताची माहिती स्थानिक नागरिक पोलिस यांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींपैकी दोन विद्यार्थी व तीन शिक्षक यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य एका विद्यार्थ्याला सातारच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम तळबीड पोलिस ठाण्यात सुरू आहे.