Accident News: वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Accident news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Accident News| 24 मे रोजी सकाळच्या वेळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर झाला असून अपघातावेळी बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. त्यामुळे यातील काही प्रवाशांना ही गंभीर दुखापत झाली आहे. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. तर मृतांना शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मिनी बस 27 प्रवाशांना घेऊन वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेली होती. मात्र ही बस दिल्ली- जम्मू नॅशनल हायवेवर येताच तिचा भीषण अपघात झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडला त्यावेळी जखमी झालेल्या लोकांच्या किंचाळ्या स्थानिकांच्या कानावर पडल्या. त्या ऐकून स्थानिक लोक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी स्थानिक पोलिसांना ही घटनास्थळी बोलवून घेतले आणि बसमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.

अपघात कसा झाला?? (Accident News)

या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. तर मृतांना शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिनी बसचे एका ट्रॅक्टरला धडक बसली होती. ही बस हायवे वरून जात असताना बसच्या पुढे एक ट्रॅक्टर होता. या ट्रॅक्टरच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे बस थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या अपघातानंतर ट्रॅक्टरचा चालक तिथून फरार झाला. जखमींनी पोलिसांना सांगितले की, ट्रॅक्टर मधला चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याने अचानक ब्रेक मारल्यामुळे बस ट्रॅक्टरला धडकली. यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. आता या सर्व माहितीच्या आधारावर पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करीत आहेत.