Accident News : देशात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताही अशीच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघात मध्य प्रदेशात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटलयामुळे हा भीषण अपघात झाला. पोलीस या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत.
नेमकं काय घडलं – Accident News
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे शाहपुरा पोलिस स्टेशन आणि बिछिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाले आणि मोठा अपघात घडला. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २१ जण गंभीररित्या जखमी झाले असून शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हंटल जात आहे. अपघाताची माहिती रात्री उशिरा पोलिसांपर्यंत पोहोचल्याने जखमी सुमारे दीड तास घटनास्थळीच वेदनेने तडफडत होते.
#WATCH | Madhya Pradesh: 14 people died and 20 injured after a pick-up vehicle lost control and overturned at Badjhar ghat in Dindori. Injured are undergoing treatment at Shahpura Community Health Centre: Vikas Mishra, Dindori Collector
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 29, 2024
(Visuals of the injured who are undergoing… pic.twitter.com/24CjMnprEb
रिपोर्ट्सनुसार, अपघात झालेले (Accident News) सर्वजण बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला गेले होते, मात्र घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाव घातला. या अपघातात मदनसिंग आरमो 50 वर्षे, पिताम बरकडे 16 वर्षे, पुन्नू वडील रामलाल 55 वर्षे, भड्डी बाई 35 वर्षे, सेमबाई पती रमेश 40 वर्षे, लालसिंग 53 वर्षे, मुलिया 60 वर्षे, तित्री बाई 50 वर्षे, सावित्री 55 वर्षे , सरजू 45 वर्षे, रमीबाई 35 वर्षे, बसंती 30 वर्षे, रामवती 30 वर्षे, कृपाल 45 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला.