Sunday, February 5, 2023

घातपातचा संशय : सातारा रेल्वे स्टेशनला हात पाय नसलेला मृतदेह आढळला

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या मार्गावर क्षेत्र माऊलीच्या चौकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहास हात व पाय नसल्याने हा प्रकार घातपताचा आहे की त्याचे अवयव कोण्या हिंस्त्र प्राण्यानी खाल्ले आहे .याबद्दल सातारा पोलीस तपास करत आहेत.

साताऱ्यातील मुख्य रेल्वे स्टेशन असलेल्या रोडवर एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना काही नागरिकांकडून सांगण्यात आली होती. याबद्दलची माहिती मिळताच सातारा शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

सदरचा व्यक्ती हा सातारा तालुक्यातील सोनगाव येथील गावचा रहिवासी असल्याचे देखील प्राथमिक तपासामध्ये उघड झाले आहे. तर त्यांच्या नातेवाईकांनी देखील त्याची ओळख पटवली आहे. सातारा शहर पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून हा प्रकार कशामुळे घडला आहे. याचा त्यांनी कसून तपास सुरू करत आहे.