Accident Video : मजा झाली सजा!! 50 फुटांवरून कोसळली क्रेझी राईड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

Accident Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Accident Video) लहानपणी जत्रेत उंच आणि फिरत्या आकाश पाळण्यात बसायची मजा तुम्हीही घेतली असेल. गावागावात आणि शहराशहरात अनेकदा विविध जत्रा येत असतात. ज्यामध्ये मोठमोठे आकाश पाळणे असतात. काळानुरूप या आकाश पाळण्यांचे स्वरूप बदलले आहे. आजकाल हे आकाश पाळणे क्रेझी राईड म्हणून ओळखले जातात. तुम्ही बऱ्याचवेळा अशा क्रेझी राईड्समध्ये तांत्रिक बिघाड आल्याने पाळणे मधेच बंद पडले किंवा तुटल्याचे ऐकले असेल. यावरून अंदाज येतो की, मजेशीर वाटणारे हे पाळणे अनेकदा धोकादायक ठरू शकतात. दरम्यान अजून एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

५० फूट उंचावरून कोसळला आकाशपाळणा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो एका थीम पार्कमधला आहे. (Accident Video) या व्हिडीओ दिसणारी दुर्घटना काळजाचा ठोका चुकवणारी आहे. एका थीम पार्कमध्ये असलेला एक फिरता पाळणा थेट ५० फूट उंचावरून खाली धाडकन खाली कोसळल्याचे यामध्ये आपण पाहू शकते. हा पाळणा कोसळल्यानंतर जे घडले ते खरोखरच फार भयानक होते. घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पहा व्हिडीओ (Accident Video)

आकाश पाळणा म्हणा किंवा क्रेझी राईड .. लहान मुलांसाठी हा आकर्षणाचा भाग असतो. पण, अनेकदा या क्रेझी राइड्स जीवघेण्या ठरताना दिसून आल्या आहेत. आताही सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून आकाश पाळणे किती धोकादायक ठरू शकतात याचा अंदाज येतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका क्रेझी राइडवर अनेक लोक आनंदात आणि उत्साहात एन्जॉय करत आहेत. (Accident Video)मात्र काही सेकंद हा राइड हवेत स्विंग करताना पुढच्याच क्षणी हवेतच तुटते आणि थेट ५० फूट उंचावरून खाली कोसळते. यामुळे आनंद घेणारे हे लोक काही सेकंदातच जीव वाचवण्यासाठी किंचाळू लागतात. हे दृश्य पाहणे अत्यंत चित्तथरारक आहे. ज्या प्रकारे ही राईड कोसळली आहे, ते पाहून अनेकजण जखमी झाले असतील याचा अंदाज येतो.



हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर wpd2.0 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. यावर बऱ्याच लोकांनी विविध प्रतिक्रिया देताना हळहळ व्यक्त केली आहे. माहितीनुसार, हा व्हिडीओ ४ वर्षे जुना आहे. ही घटना १५ जुलै २०१९ रोजी गुजरातच्या अहमदाबादच्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये घडली होती. ज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आणि २९ जण जखमी झाले होते. हा व्हिडीओ जुना जरी असला तरी अशा घटना वारंवार घडत असतात. (Accident Video)त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अशा राईड्समध्ये बसणे किती धोकादायक आहे हे समजते .