Pune Crime : पोलीस दलात खळबळ!! ACP कडून पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या (Pune Crime )केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (Bharat Gaikwad) असं सदर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहेत.

पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात भारत गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर सुद्धा गोळी झाडून घेतली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकारांची माहिती चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

भारत गायकवाड आपल्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या करून नंतर स्वतःची आत्महत्या का केली? यामागे नेमकं काय कारण होते? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे या हत्याकांडाचे गूढ समोर येतेय का हे बघितलं पाहिजे. परंतु या संपूर्ण घटनेनं पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.