अखेर विमानात तालिबानविषयी विनोद करणाऱ्या ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याची निर्दोष मुक्तता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2022 साली भारतीय वंशाच्या आदित्य वर्मा (Aditya Varma) या ब्रिटीश विद्यार्थ्याने विमान उड्डाणावेळी आपल्या काही मित्रांना तालिबानसंदर्भात (Taliban) एक विनोद स्नॅपचॅटवर पाठवला होता. याप्रकरणी त्याच्यावर स्पॅनिश न्यायालयात खटला देखील सुरू होता. आता या खटल्यामध्ये आदित्य वर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर त्याला न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे. त्यामुळे आदित्य वर्मा याला मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमके काय घडले होते?

2022 साली ब्रिटिश युनिव्हर्सिटी ऑफ स्पेनमध्ये शिकणाऱ्या आदित्य वर्मा या भारतीय विद्यार्थ्याला तालिबानविषयी विनोद करणे महागात पडले होते. असे झाले की, 2022 च्या जुलैमध्ये आदित्य वर्माने ब्रिटनच्या गॅटविक विमानतळावरून मेनोर्कासाठी फ्लाइट घेतली. त्याचवेळी त्याने फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. इतकेच नव्हे तर, तो तालिबानचा सदस्य असल्याचेही सांगितले. त्याने स्नॅपचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा मेसेज टाकला होता.

आदित्य वर्माने ही अफवा पसरवल्यानंतर लगेचच ब्रिटिश विमानतळाने स्पेनला इशारा दिला. यानंतर दोन F-18 लढाऊ विमानांनी या विमानाला दोन्ही बाजूंनी घेरले आणि आदित्य वर्माला अटक केली. यानंतर त्याच्या विरोधात स्पेनमध्ये खटला चालवण्यात आला. या खटल्यामध्ये न्यायालयाने आदित्यला दंड भरण्याचे आदेश दिले होते. मात्र अखेर 2024 पर्यंत सुरू असलेल्या या खटल्यात आदित्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. आदित्यने फक्त मस्करी म्हणून हा विनोदी संदेश ग्रुपवर टाकला होता हे न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहे.