कराड पोलिसांची कारवाई : मोबाईल शाॅपी फोडणारे 3 युवक ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील शाहुचाैक येथील जय महाराष्ट्र मोबाईल अँण्ड गिफ्ट गॅलरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुची भिंत फोडून चोरी केली. मोबाईल दुकानातील 78 हजार रुपये किंमतीचे साहित्य व मोबाईल हॅन्डसेटची चोरी करण्यात आली. याबाबतची फिर्याद दिपक सोनाराम पुरोहीत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात वैभव वसंतराव पाटील (वय- 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. कराड), अल्ताफ मगदुम मुल्ला (वय- 19 वर्षे, रा. चचेगाव ता. कराड), प्रतिक अजयचंद्र काळोखे (वय- 18 वर्षे, रा. सिद्धार्थनगर चचेगाव ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयित युवकांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले. बी. आर. पाटील यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कराड शहरामध्ये तीन इसम कमी किंमतीमध्ये मोबाईल हॅन्डसेट व मोबाईलचे साहित्य विक्री करीत आहेत. सपोनि अमित बाबर व पथकास प्राप्त झाले बातमीचा आशय समजावून सांगून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने नमुद तीन इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किंमतीची मोपेड असा एकुण 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सपोनि अमित बाबर, सपोनि सखाराम बिराजदार, पोलीस अंमलदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी सदरची कारवाई केली आहे.