प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारल्यास कारवाई होणार : चैतन्य कणसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील त्या- त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बसेससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. कमाल भाडे दर शासनाने दि. 24 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चीत केले आहे. त्यामुळे कोणी मनमानी पध्दतीने भाडे आकारणी केल्यास त्याच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड येथील प्र. सहा. प्रादेशिक परिहवन अधिकारी चैतन्य कणसे यांनी कळविले आहे.

चैतन्य कणसे म्हणाले, दिवाळी सणानिमित्ताने लोक मोठ्या प्रमाणावर गावाकडे ये- जा करत असतात. तसेच सणांच्या सुट्टीमुळे लोकांचा प्रवास वाढलेला आढळून येतो. या काळात लोकांची गर्दी वाढत असल्याने अनेकदा मनमानी पध्दतीने भाडे आकारले जाते. परंतु यावर शासनाचे नियम आहे. तेव्हा त्या नियमानुसार कितीही चांगली सुविधा देणारी बस किंवा गाडी असली तरी नियमानुसार असलेल्या तिकिट दरापेक्षा 50 टक्के पेक्षा अधिक तिकीट आकारता येत नाही. प्रवाशांनी चुकीच्या पध्दतीने तिकीट आकारणी करून लूट करत असल्यास आमच्यांशी संपर्क साधावा. परंतु त्या करिता तिकीट व सबळ पुरावा असणे गरजेचे आहे.

दिवाळी व इतर सणांवेळी प्रवाशांना गर्दीच्या हंगामात प्रवास करतांना येणाऱ्या अडचणीबाबत  कार्यालयाच्या 9420662147 या व्हॉटस्‌अप क्रमांकावर व [email protected] या ईमेल आयडीवर आपली तक्रार वाहनाचे सुस्पष्ट नोंदणी क्रमांक छायाचित्रासह व प्रवासी तिकीट इत्यादी तपशीलास नोंदवावी. तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या [email protected] या इमेल आयडीवरही आपली तक्रार नोंदविता येईल. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यसात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे, प्र. सहा. प्रादेशिक परिहवन अधिकारी, कराड चैतन्य कणसे यांनी कळविले आहे.