दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav) यांच्या निधनातून आपण सावरतच नाही तर दुसरीकडे बॉलीवूड मधून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते अशोक कुमार (ashok kumar ) यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरीचं (bharti jaffrey) निधन झाल्याचे समोर आले आहे. आज 20 सप्टेंबरला भारतीने अखेरचा श्वास घेतला. भारतीवर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती अभिनेत्री आणि फिल्मेकर नंदिता दास यांनी दिली. भारती जाफरी यांच्या निधनांने बॉलीवूडवर शोकाकळा पसरली आहे.अभिनेत्री भारती जाफरी यांना अनेक कलाकारांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

भारती जाफरी (bharti jaffrey) यांच्या निधनानंतर बॉलीवूड अभिनेता आणि भारती यांचा नवरा कंवलजीत सिंह यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांचा आणि भारतीचा (bharti jaffrey) फोटो शेअर केला आणि त्यावर आमची प्रेमळ भारती जाफरी मुलगी, बहीण, पत्नी, आई, ताई, काकू, शेजारी, मैत्रीण आणि आमची प्रेरणा 20 सप्टेंबरला आम्हाला सोडून गेली अशा पद्धतीची भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

भारती जाफरी यांची कारकीर्द
आजपर्यंत भारती जाफरी (bharti jaffrey) यांनी आपल्या कारकिर्दीत हजार चौरासी की मां, सास, दमन आणि देवी अहिल्या बाई सारख्या सिनेमात काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर