मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपलं स्वतःचा हक्काचा घर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते मात्र त्यातल्या काहीच जणांची इच्छा पूर्ण होते. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांना म्हाडाची लॉटरी म्हणजे सुवर्णसंधी असते. या संधीचं सोनं करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. यामध्ये मग पत्रकार ते अगदी मोठमोठे कलाकार यांचा देखील समावेश असतो. यंदाच्या मुंबई म्हाडा लॉटरीसाठी 2030 घरांची निवड करण्यात आली होती. या घरांसाठी अनेकांनी पसंती दर्शवली होती. शिवाय तब्बल 13,4350 अर्ज म्हाडाला प्राप्त झाले होते. म्हाडाच्या एका घरासाठी तब्बल 27 कलाकारांनी अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे याला म्हाडाची लॉटरी लागली आहे.
अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांनी पवई येथील घरासाठी म्हाडा लॉटरीचा अर्ज भरला होता. पवई मधील म्हाडाच्या उच्च श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घराची किंमत जवळपास एक कोटी 76 लाख रुपये आहे.
कोणत्या कलाकारांना मिळाले घर?
मुंबईतल्या गोरेगाव येथील म्हाडाच्या घरासाठी तब्बल 27 कलाकारांनी अर्ज केला होता. त्यामध्ये बिग बॉस मराठी मधील एका पर्वाचा विजेता विशाल निकम, लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी, अभिनेत्री गौतमी देशपांडे, नारायण शास्त्री, अभिनेत्री किशोरी विज, रोमा बाली, तनया मालजी, अनिता कुलकर्णी संचित चौधरी, शेखर नार्वेकर यांनी अर्ज केला होता. त्यामधील गोरेगाव चे घर हे गौतमी देशपांडे या अभिनेत्रीला मिळाले आहे, त्याचप्रमाणे कन्नमवार नगर मधील घर हे महाराष्ट्राचे हास्य जत्रा फिल्म अभिनेता निखिल बने यांना मिळाले आहे. तर कन्नमवार नगर मधील घराची किंमत ही 40 लाख रुपये असल्याची चर्चा आहे. मात्र गौतमीच्या गोरेगाव मधील घराची किंमत अद्याप समोर आलेली नाही. बिग बॉस विजेता फेम अभिनेता शिव ठाकरे आणि गौरव मोरे यांच्या घराचे विशेष चर्चा सध्या रंगली आहे.