अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्मा (andrila sharma) हिचे निधन झाले आहे. तिने आज कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिच्या (andrila sharma) निधनाची बातमी समजताच चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत्यूशी झुंज अपयशी
गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक होती. तिला 15 नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतरच तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. ती कोमामध्ये होती. एंड्रिला शर्मा हिला वाचवण्यासाठी कुटुंबाने आत्तापर्यंत पाण्यासारखा पैसा खर्च केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आज अखेर एंड्रिला शर्माची (andrila sharma) मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

एंड्रिला शर्मा (andrila sharma) बंगाल इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. एंड्रिला शर्माने ‘झुमुर’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिनं तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर तिने अनेक लोकप्रिय शोमध्ये कामसुद्धा केले होते. तसेच ती ‘जीवन ज्योती’, ‘जिओं काठी’मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय