अभिनेत्री कंगना रणौत कोरोना पॉझिटिव्ह ; ‘मी त्याला संपवेन म्हणत’ स्वतःच दिली माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजवला असताना अनेक खेळाडू, नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता सतत ट्विटरवर ॲक्टिव असणाऱ्या आणि परखडपणे आपलं मत सोशल मीडियावर मांडणाऱ्या कंगना रानौतला देखील करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः दिली आहे. कंगना चे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ती इतर सोशल नेटवर्किंग साईटवरून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट आहे. तिने आपलया इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत कोरोना पॉझिटिव असल्याची माहिती दिली आहे. तीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह ,अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मीकोविड पॉझिटिव्ह आले आहे”.

कंगना पुढे म्हटले आहे की, “मी स्वतः आयसोलेट करून घेतले आहे. मला काही कल्पना नाहीये की हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करतोय आता मला एवढं माहिती आहे की मी त्याला संपवेल कोणत्याही शक्‍तीला तुमच्या पेक्षा वरचढ होऊ देऊ नका तुम्ही जर घाबरला तर ते आणखी तुम्हाला आणखी घाबरवतील. चला कोविडचा विनाश करु. यात काही नाहीये फक्त एक ठराविक काळाकरता आलेला ताप आहे. त्याला प्रसिद्धी जास्त मिळाली आहे आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव!” अशा आशयाची पोस्ट कंगना राणावत न आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून करत करून पॉझिटिव असल्याची माहिती दिली आहे

You might also like