Adam Gilchrist : ‘तो’ कॅच सुटला अन निवृत्ती जाहीर केली; गिलख्रिस्टचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) ,…. ऑस्ट्रलियन संघाचा महान विकेटकिपर बॅट्समन … आणि तेवढाच आक्रमक फलंदाज… विकेटकिपिंग कशी करावी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲडम गिलख्रिस्ट… आत्तापर्यंत विकेटच्या पाठीमागे तब्बल ६०० च्या आसपास शिकार केलेल्या ॲडम गिलख्रिस्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली. मात्र एक सोप्पा कॅच सुटल्यामुळेच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याचा खुलासा गिलख्रिस्टने केला आहे. 2008 मध्ये भारताविरुद्धच्या ॲडलेड कसोटीच्या मध्यावर गिलख्रिस्टने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र अचानक निवृत्तीमागचं कारण त्याने आता सांगितलं आहे.

क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना मी व्हीव्हीएस लक्ष्मणचा सोप्पा झेल सोडला आणि तेव्हाच माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आम्हाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी जाताना कदाचित ९९ कसोटी सामने माझ्या नावावर असत्या. आणि मी १०० कसोटी खेळणारा खेळाडू सुद्धा बनू शकलो असतो. मात्र त्याच दरम्यान मी व्हीव्हीएस लक्ष्मणचा झेल सोडला. तो एक सोपा झेल होता. चेंडू जमिनीवर आदळला. यानंतर माझा सुटलेला झेल मैदानावरील स्क्रिन वर तब्बल 32 वेळा दाखवला गेला.

गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, यानंतर मी मॅथ्यू हेडनकडे गेलो आणि त्याला म्हणालो माझी वेळ संपली आहे. हातातील ग्लोव्जला लागलेल्या चेंडूपासून गवतावर पडलेल्या चेंडूपर्यंत, एका क्षणात मला कळले की आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. त्यावेळी मॅथ्यू हेडनकडे मला खूप समजवले. इतका कठोर निर्णय लगेच घेऊ नको असं हेडन सातत्याने मला सांगत होता, मात्र मी त्याच काहीही ऐकलं नाही आणि निवृत्ती जाहीर केली असं ॲडम गिलख्रिस्टने सांगितलं.