सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मुलांसाठी ठरतंय धोकादायक!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन (Smartphone0 आज-काल अन्न वस्त्र निवाराप्रमाणे गरजेचा झाला आहे. कोणतेच काम स्मार्टफोन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नाही तर आजकाल स्मार्टफोनवरच ऑफिशियल पर्सनल बँकिंग रिलेटेड सर्व काम होत असतात. परंतु लहान मुलांना देखील आजकाल मोबाईलची चांगलीच सवय लागली आहे. काही मुले तर मोबाईल (Mobile) हातात घेतल्याशिवाय जेवतही नाहीत. मोबाईलचे हे वाढत चाललेलं व्यसन लहान मुलांसाठी चांगलंच धोकादायक ठरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LocalCircles यांनी केलेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले आहे कि, मोबाईलचा अतिवापर लहान मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर वाईट प्रभाव टाकत असतो. . स्मार्टफोनवर आजकाल लहान मुलं ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म या ठिकाणी जास्त वेळ घालवतात. परंतु सतत मोबाईल वापरल्यामुळे मुलांमध्ये आळशीपणा,उदासीनता आणि राग वाढतो आहे. लोकल सर्कल्स चे संस्थापक सचिन तापडिया यांनी सांगितलं की, सरकार लवकरच नवीन डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू करणार आहे. यामुळे 18 वर्षापेक्षा कमी वयाचे मुलं वापरत असलेल्या अँप्स साठी मुलांना आई-वडिलांची संमती घ्यावी लागेल. या संदर्भात लोकल सर्कल ने एक रिसर्च केला आहे. जाणून घेऊया या रिसर्च च्या माध्यमातून मिळालेली माहिती.

मुलांचे पालक काय म्हणतात?-

देशामध्ये 296 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात आला. या सर्वे मध्ये 46 हजार लोकांचे मत घेण्यात आले. त्यावेळी भारतामधील 61% शहरात राहणाऱ्या पालकांनी सांगितले की, त्यांची मुलं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की यामुळे फक्त मुलांमध्ये आक्रमकता वाढत नाही तर अधिक आणि अतिक्रियाशीलता देखील जाणवते. पण यामुळे मुलांची एकाग्रता पूर्णपणे नष्ट होत असल्याचे देखील दिसतं. त्याचबरोबर 73% आईवडिलांनी सांगितलं की सोशल मीडियाच्या अमर्यादित वापरामुळे मुलांवर दीर्घकालीन परिणाम दिसण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी सोशल मीडिया नेटवर्किंगमध्ये सहभागी होण्यासाठी आई वडिलांची सहमती घ्यायला हवी. त्याचबरोबर ऑनलाइन मीडिया, OTT व्हिडिओ आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म साठी सरकारकडून डेटा संरक्षण कायदे बनवण्यात यायला पाहिजे.

कोरोनापासूनच मोबाईलच वेड वाढलं –

लहान मुलांना मोबाईलचे सर्वात जास्त वेड हे कोरोना महामारी पासून लागले आहे. या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे शाळा- कॉलेज पुर्णपणे बंद होते. काही काळानंतर ऑनलाइन पद्धतीने शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक मुलांना मोबाईलची गरज भासू लागली. आणि तेव्हापासून मुलांना मोबाईल वापरण्याची सवय लागली. 2022 नंतर सर्व स्कूल आणि कॉलेज ऑफलाईन सुरू झाले तरीही मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर वाढत गेला.

खास करून ९ ते १८ वर्षांच्या मुलांची मोबाईल वापरण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कमी वयात या मुलांमध्ये आक्रमकता, उदासीनता, एकाग्रतेची कमी यासारखे परिणाम दिसून येत आहेत. एवढेच नाही तर आरोग्य संदर्भात बरेच रोग देखील मुलांना लागले आहे. जास्त मोबाईलच्या वापरामुळे डोकेदुखी, डोळे आणि पाठीच्या समस्या, तणाव, चिंता, सुस्ती येणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत.