पाटणला 9 गावातील अतिरिक्त पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
पाटण मतदारसंघातील शेत/ पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण मतदारसंघातील 28 गावातील सुमारे 35.500 कि. मी. लांबीच्या शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित 09 रस्त्यांचाही पुरवणी आराखड्यात समावेश करण्यात आला असल्याने 14. 500 कि. मी. रस्त्यांचे कामांना मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 63 गावांतील 69 कि.मी.लांबीचे शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 28 गावांतील सुमारे 35.500 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश केला हेाता. तर उर्वरित 09 रस्त्यांचाही पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला असल्याने 14.500 कि.मी.रस्त्यांचे कामांना मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे.

मंजूर पाणंद रस्ते पुढीलप्रमाणे ः- ठोमसे लोहारवस्ती ते शंभूराज मंदिर पाणंद रस्ता 02 कि.मी., येराडवाडी ग्रामपंचायत ते पाणी पुरवठा विहिर माकडी शिवार पाणंद रस्ता 01 कि.मी., लेंढोरी प्राथमिक शाळा ते नदीपर्यंत पाणंद रस्ता 02 कि.मी., ऊरुल महेश निकम यांचे शेड ते गाव विहिर पर्यंत पाणंद रस्ता 1.500 कि.मी., कोरिवळे ते पाळेकरवाडी पाणंद रस्ता 1.500 कि.मी., ढेरुगडेवाडी(येराड) ढेरुगडेवाडी येराड हुंबरपेढा येथे पाणंद रस्ता 1.500 कि.मी., कुठरे पागेवाडी ते वाझोली पाणंद रस्ता 01 कि.मी., झाकडे येथे पाणंद रस्ता 02 कि.मी., माजगाव ऊरुल पाणंद रस्ता 02 कि.मी. या 09 गावांतील 14.500 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.