हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे आपण घरात बसून जगभरातल्या सगळ्या गोष्टी समजतात. लोकांना देवाणघेवाणीसाठी एक चांगले माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेले आह. यावर आपण अनेक व्हिडिओ पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ (Aditi Sarngdhar Viral Video) वादळवाट मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती सारंगधर हिच्याबाबत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आदितीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक कॅब चालक दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून आदितीने कॅब चालक आणि तिला दिलेल्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्या प्रसिद्ध कॅप कंपनीला तिने व्हिडिओसोबत टॅग देखील केलेले आहे.
अदितीने शेअर केला व्हिडीओ | Aditi Sarngdhar Viral Video
या व्हिडिओमध्ये कॅब चालक गाडी चालवताना अदितीशी बोलत आहे. आदिती त्याला गाडीतील एसी वाढवायला सांगते. तेव्हा तो ड्रायवर नाही म्हणतो. कॅब चालकाचा हा व्हिडिओ शेअर करून आदितीने कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “हे पुण्यातील कॅब चालक आहे. अतुल वाघ त्यांचे नाव आहे.” प्रसिद्ध कॅप कंपनीला टॅग करून तिने ही माहिती दिलेली आहे. ती म्हणाली की, “ही घृणास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा प्रकारचे वर्तन अस्विकार्य आहे.”
आदितीने जेव्हा त्या ड्रायव्हरला एसी वाढवायला सांगितला तेव्हा तो म्हणाला की, “एसी एक वरच ठेवणार बसायचं तर बसा नाहीतर खाली उतरा. तक्रार करण म्हटलं तर तुम्हाला काय करायचं ते बिंदास करा” मागे खूप गरम होत असताना देखील त्या कॅब ड्रायव्हरने एसी न वाढवल्याची तक्रार तिने सोशल मीडियावर केली आहे.
यावर आदितीने सांगितले की त्याने सुरुवातीला एक लोकेशन सांगून दुसरीकडे उभा राहिला आणि म्हणाला की “मला तुम्ही 7 मिनिटे वाट बघायला लावतील मॅडम.” त्याला विनंती केली प्लीज खिडकी उघडी मला गुदमरत आहे. तर तो चिडला आणि अत्यंत गुर्मिने बोलत होता. ती गाडी देखील अत्यंत अस्वच्छ आणि वास येणारी होती.” अशाप्रकारे तिने त्या कॅप ड्रायव्हरची माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे आणि त्यांच्या कॅब कंपनीला देखील टॅग केलेले आहे.