आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट; नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देशाई सोबत होते. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यांचा शाल देऊन गौरव केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तेजस्वी यांच्यासोबत मंत्री आलोक मेहता, आमदार सुनील कुमार सिंह उपस्थित होते.

आमची भेट राजकीय नव्हती. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली पण राजकारणावर चर्चा केली नाही. आम्ही दोघे एकाच वयाचे आहोत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो पण कोविडमुळे भेटू शकलो नाही त्यामुळे आज आम्ही भेटलो, आमची मैत्री कायम राहील असं आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल. तर तेजस्वी यांची भेट घेण्यावरून भाजपने आदित्य यांच्यावर हिंदुत्त्वावरून टीका केली त्याचाही त्यांनी समाचार घेतला. ज्यांनी सत्तेसाठी पीडीपी सोबत युती केली त्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये अस प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी भाजपला दिले.

दुसरीकडे तेजस्वी यादव यांनीही आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर स्पष्ट राजकीय संकेत दिले आहेत. कायदा आणि लोकशाही वाचवण्याचे सध्याचे आव्हान आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे देशभरात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात का ते आता पाहावं लागेल.