व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आदित्य ठाकरेंचा हटके अंदाज पाहिलाय का? बेभान होत वाद्यावर धरला ठेका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी राजकारणामुळे तसेच काही ना काही कारणांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे नेकमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा एका वेगळ्याच अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते बेभान होऊन वाद्य वाजवताना दिसत आहेत.

आमदार आदित्य ठाकरे यांनी वाद्य वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरेंचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील जुहू चौपाटी येथील‘बिर्ला लेन’चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी त्या ठिकाणी इतर काही तरुणतरुणी ड्रम वाजवत बसले होते. त्यावेळी त्यांना पाहता आदित्य ठाकरे यांनाही ड्रम वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी त्यांच्यात बसून तात्काळ वाद्य वाजवण्यास सुरुवात घेत आनंद लुटला.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या खासदार निधीतून मुंबईतील जुहू चौपाटी येथे बिर्ला लेनचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वाजविलेला ड्रमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.