हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू अन दिशा सालियनच्या (disha salian) मृत्यू यामुळे एक खळबळ उडाली होती. त्यावेळी दिशाने आत्महत्या केली असल्याचा दावा करण्यात आला होता, पण आता तिच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे सालियनचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते? अशा अनेक प्रश्नांचा वर्षाव होताना दिसत आहे , आता अखेर सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट झाला आहे, अन त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट –
दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत यावर स्पष्टता दिली, त्यांनी सांगितले की, दिशाच्या मृत्यू झाला तेव्हा ते रुग्णालयात होते, कारण त्यांच्या आजोबांवर उपचारा सुरु होते. आदित्य ठाकरे यांनी हे देखील म्हटले की, “कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल.” ते अजूनही कोर्टात बोलायला तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप –
दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्या मृत्यू प्रकारणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा हा आहे कि , 8 जून 2020 रोजी दिशाच्या घरात एक पार्टी चालली होती, ज्यामध्ये आदित्य ठाकरे, त्यांचा अंगरक्षक, सूरज पांचोली, अन दिनो मोरिया उपस्थित होते. पार्टीच्या वातावरणात अचानक बदल घडला, आणि नंतर दिशाला शांत करण्यासाठी काही लोकांनी तिचा जीव घेतला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.