मनपाच्या सीबीएसई शाळांत प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.पहिल्या टप्प्यात उस्मानपुरा व गारखेडा या दोन शाळात ही सुविधा सुरू केली जात आहे. शहरातील गरीब व होतकरू मुलांना इंग्रजी माध्यमातून दररोज शिक्षणं देण्यासाठी या शाळांमध्ये अनुक्रमे 24 व 25 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. लवकरच या शाळांमधील प्रवेश पूर्ण होतील अशी माहिती उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सोमवारी दिली.

या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. एलकेजी, युकेजी, फस्ट आणि सेकंड हे चार वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. पालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षण अत्यंत हुशार व विद्यार्थीप्रिय आहेत. या शिक्षकामधूनच निवड करून 25 ते 30 शिक्षकांकडे सीबीएससीच्या वर्गाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सीबीएससीचे वर्ग योग्य प्रकारे चालवण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, सर्व स्तरातील मुलामुलींना प्रवेश मिळावा, प्रत्येक पालकांना ही शाळा आपली वाटावी, या हेतूने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे परिश्रम घेत आहेत