निसर्गकट्टा | सुनिल शेवरे
पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीमाल, रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने, सेंद्रिय वस्त्रे या पर्यावरणपूरक वस्तूंचे ‘अद्रिष’ हे व्यापार विक्री केंद्र पुण्यात ‘सात्विक’तर्फे समारंभपूर्वक सुरु झाले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे कणेरी मठ कोल्हापूर येथील काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. गणेशाची पूजा करून त्यांनी उद्घाटन केले.
या प्रसंगी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, पुण्यामध्ये ‘अद्रिष’चे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे सामान्य माणसांच्या निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक हे व्यापार विक्री केंद्र स्तुत्य उपक्रम आहे. या उद्घाटन कार्यक्रमास पुणेकरांनी गर्दी केली. अद्रिषचे अक्षय अगरवाल ,सौरभ साळुंखे,गजेंद्र चौधरी यांच्या या उपक्रमाला पुणेकरांचा खूप प्रतिसाद लाभला. उद्घाटन करताना गाईची पूजा करून, गाईला सेंद्रिय अन्न खावयास देऊन अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.
पुण्यातील अद्रिष या पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंच्या व्यापार विक्री केंद्रात किराणासामान , स्वयंपाक घरातील उपकरणे ,गृहपयोगी वस्तू , सेंद्रिय वस्त्रे , रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने हे सारे कमी दारात उपलब्ध आहे. कापडी पिशव्या , समान बसतील अशी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त खोकी उपलब्ध आहेत.घरपोच सेवा देखील या व्यापार विक्री केंद्रातर्फे दिली जाणार आहे. निरोगी आणि प्रदूषणमुक्त जीवन शैलीची ही वाटचाल आहे असे अक्षय अगरवाल उद्घाटन प्रसंगी म्हणाले.
भारतातील शून्य कचरा व्यवस्थापन सेंद्रिय जीवनशैली संकल्पना राबवणारे प्रमुख हे व्यापार विक्री केंद्र आहे .‘सात्विक’तर्फे अदृश्य (अद्रिष) पर्यावरणपूरक शून्य कचरा व्यवस्थापनाच्या अनुशांगाने रसायनमुक्त जीवनोपयोगी वस्तू असलेले इको फ्रेंडली व्यापार केंद्र सुरु झाल्यामुळे पर्यावरण प्रेमी व आरोग्याबद्दल दक्ष असणाऱ्या पुणेकरांची मोठी सोय झाली आहे. कोल्हापूरच्या कणेरी मठाचे श्रध्देय पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या संकल्पनेतून शुद्ध व निरोगी जीवनासाठी आवश्यक असणारी सेंद्रिय आणि रसायनमुक्त जीवन पद्धती सात्विकमध्ये साकारली असून त्यांची सर्वत्र २५ केंद्रे असून ,’अद्रिष’ हे पुण्यात नव्यानी सुरु झाले आहे.
सेंद्रिय शेती करणाऱ्यांना हमी भाव आणि ग्राहकांना कमी भावात माल मिळेल व समाजात विषमुक्त अन्नाविषयक जागरूकता येईल. हे जाणून घेऊन अक्षय अगरवाल आणि सौरभ साळुंखे व गजेंद्र चौधरी यांनी सात्विक तर्फे अद्रिष म्हणजे ‘अद्रुश्य’ची सुरुवात केली . या प्रसंगी बाबासाहेब साळुंखे (माजी शास्त्रज्ञ- कृषी महाविद्यालय पुणे )आणि कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक दिगाज्जांची विशेष उपस्थिती लाभली.आभार प्रदर्शन बाबासाहेब साळुंखे यांनी केले.