Aerobic Exercises | आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे अनेकवेळा दुर्लक्ष करतो. परंतु आपले आरोग्य निरोगी असेल तर आपण सगळ्या गोष्टी नीट करू शकतो. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजार देखील आलेले आहेत. त्यामुळे आपल्या शरीराकडे वेळीच लक्ष देणे खूप गरजेचे आहेत. यासाठी दररोज व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. अनेकांना जिममध्ये जाण्यास वेळ नसतो. त्यामुळे त्यांना जिममध्ये जाऊन व्यायाम करणे देखील शक्य नसते. परंतु अशावेळी तुम्ही घरी राहून देखील चांगला व्यायाम (Aerobic Exercises) करू शकता.
आता आपण घरी राहूनच अशा काही व्यायामाबद्दल जागून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचे शरीर, हृदय त्याचप्रमाणे मन देखील एकदम फ्रेश राहील. हे व्यायाम तुम्ही जिममध्ये न जाता देखील करू शकता.
वॉकिंग अँड जॉगिंग
जे हार्ट पेशंट आहेत त्यांना अनेकवेळा हलकासा व्यायाम करण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले असते. त्यामुळे अशा व्यक्तींना वॉकिंग करणे किंवा जॉगिंग करणे. हा व्यायाम सगळ्यात चांगला मानला जातो. यामुळे त्यांच्या हृदयावर देखील कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
एरोबिक डान्स |Aerobic Exercises
एरोबिक व्यायामांपैकी हा एरोबिक डान्स आहे. तो सध्या खूप लोकप्रिय आहे. हा व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढतो आणि हृदय आणि मेंदूसाठी देखील हा व्यायाम (Aerobic Exercises) खूप फायदेशीर असतो. हा व्यायाम करताना रक्ताभिसरण प्रोसेस वाढते. तसेच तुमचे हृदय देखील चांगल्या प्रकारे काम करते. जर एखाद्याला हृदयविकाराचा त्रास असेल, तर तो हा एरोबिक डान्स करताना काळजी घ्यावी लागेल. कारण जर तुम्ही अगदी जोरदार डान्स केला तर तुमच्या हृदयावर देखील तहान येण्याची शक्यता असते.
सायकलिंग करणे
सायकलिंग करणे हा देखील तुमच्या हृदयासाठी अत्यंत योग्य असा व्यायाम आहे. या सायकलिंगमध्ये आपले हात पाय तसेच हृदयाचे स्नायू सगळे मजबूत होतात. आपल्या शरीरातील सगळेच अवयव हालत असतात. त्यामुळे तुमची रक्तभिसरन संस्था ही चांगली काम करते आणि तुमच्या हृदय देखील निरोगी होते.
त्यामुळे तुम्हाला जर रोज जिमला जाणे शक्य नसेल, तर तुम्ही हे व्यायाम घरच्या घरी नक्की करू शकता. तुमच्या आरोग्य निरोगी ठेवू शकता.