हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Affordable Bikes Under 70000 । जेव्हा आपण नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त २ अपेक्षा असतात. पहिली म्हणजे गाडी कमी खर्चात मिळावी आणि दुसरी अपेक्षा म्हणजे बाईकचे मायलेज जास्त असावं जेणेकरून पेट्रोलचा खर्च वाचेल. तुम्हीही याच २ गोष्टी असणारी बाईक खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला ७० हजार रुपयांपासून सुरु होणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या ३ दुचाकी बद्द्दल माहिती देणार आहोत. त्यासाठी हि बातमी शेवटपर्यंत वाचा…..
1) TVS Sport –
TVS Sport ही बाईक अतिशय स्टायलिश आणि स्पोर्टी आहे. गाडीची लांबी 1,950 mm रुंदी 705 mm आणि उंची 1,080 mm आहे. टीव्हीएसच्या या दुचाकीला 1,236 mm व्हीलबेस आणि 175 mm ग्राउंड क्लिरन्स देण्यात आला आहे. या बाइकमध्ये ११० सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ६.०३ किलोवॅट पॉवर जनरेट करते. हि बाईक प्रतितास 90 km स्पीडने धावू शकते. टीव्हीएस स्पोर्ट मधील फ्युएल टँकची क्षमता 10 लिटर आहे. यात १७ इंचाचे टायर आहेत आणि दोन्ही टायर्समध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे. दैनंदिन वापरासाठी बेस्ट पर्याय असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ६० हजार रुपयांपासून सुरू होते.
2) Bajaj Platina 100 – Affordable Bikes Under 70000
बजाज ऑटोची प्लॅटिना १०० ही एक विश्वासार्ह बाईक आहे. खास करून दररोजच्या वापरासाठी अत्यंत किफायतशीर, चालवायला हलकी फुलकी आणि आरामदायी बाईक म्हणून या गाडीकडे बघितलं जातं. गाडीची लांबी 2006 mm, रुंदी 713 mm आणि उंची 1100 mm आहे. तर 1255 mm व्हीलबेस आणि 200 mm ग्राउंड क्लिअरन्स या बाईकला देण्यात आला आहे. बाईकमध्ये १७-इंच टायर आहेत. समोर १३० मिमी ड्रम ब्रेक आणि मागे ११० मिमी ड्रम ब्रेक आहेत. बजाज च्या बाईक मध्ये ABS सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. मार्केट मध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत ७१ हजारांपासून सुरू होते. Affordable Bikes Under 70000
3) Hero Passion Pro-
तुम्हाला जर जर affordability, कमी खर्च (Affordable Bikes Under 70000) आणि दमदार स्मार्ट फीचर्स हवे असतील तर हिरोची Passion Pro बाईक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. म्हणूनच कि काय मागच्या अनेक वर्षांपासून हि दुचाकी ग्राहकांना आकर्षित करत आहे. दैनंदिन वापरासाठी हि बाईक तुम्हाला नक्कीच परवडेल. गाडीची लांबी 2,036 mm, रुंदी 715–739 mm आणि उंची 1,113 mm आहे तर या बाईकला 1,270 mm व्हीलबेस आणि 180 mm ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. पॅशन प्रोमध्ये ९७.२ सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ५.९ पीएस पॉवर देते. सस्पेन्शन साठी समोर:कॉन्सेनव्हन्शनल फोर्क आणि मागे ट्विन शॉक्स आहेत तर ब्रेकिंग बाबत सांगायचं झाल्यास, समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि पाठीमागील बाजूला 130 mm ड्रम उपलब्ध आहे.




