Monday, January 30, 2023

प्रेमात धोका!! प्रेयसीचे 35 तुकडे; श्रद्धा आफताबच्या प्रेमाची रक्तरंजित कहाणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीची निर्घृण हत्या करत तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आफताब अमीन पूनावाला असे सदर आरोपीचे नाव असून त्याने 6 महिन्यांपूर्वी प्रेयसी श्रद्धाची हत्या केली होती. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रद्धा वाकर ही तिच्या वडिलांसोबत पालघर येथे राहत होती. श्रद्धा मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये काम करायची आणि तिथेच आफताब आणि तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. मात्र कुटुंबीय त्यांच्या या नात्यावर नाराज होते. यामुळे दोघेही मुंबईहून दिल्लीत शिफ्ट झाले आणि मेहरौली येथील फ्लॅटमध्ये राहू लागले.

- Advertisement -

श्रद्धा तिचा वर्गमित्र लक्ष्मणच्या संपर्कात होती. लक्ष्मण श्रद्धाचे वडील विकास मदन यांना तिच्याबाबत माहिती द्यायचे. परंतु अनेक दिवस श्रद्धाने लक्ष्मणचा फोन उचलला नाही तेव्हा त्यांनी श्रद्धाच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना शंका आली . त्यानंतर काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीने ते ८ नोव्हेंबर रोजी थेट छतरपूर येथील फ्लॅटवर गेला, जिथे मुलगी भाड्याने राहत होती. तेथील कुलूप बंद झाल्यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी मेहरौली पोलीस ठाणे गाठून अपहरणाची माहिती पोलिसांना दिली आणि एफआयआर दाखल केला.

त्यांनतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता आपणच श्रद्धाची धारदार शस्त्राने हत्या केली असा धक्कदायक खुलासा केला. त्याने सांगितले की, दोघांमध्ये लग्नावरून वारंवार भांडणे होत होती. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असे. त्यामुळेच त्याने 18 मे रोजी त्याने तिची हत्या केली . येव्हडच नव्हे तर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या कानाकोपऱ्यात फेकून दिले .

आफताबने 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला होता आणि त्यात मृतदेहाचे सर्व तुकडे ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजता फ्लॅट मधून बाहेर पडत जंगलात मृतदेहाचे तुकडे टाकायचा. जवळपास 16 दिवस अशा प्रकारे मृतदेहाचे तुकडे त्याने फेकले होते. सध्या आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेने माणुसकी आणि प्रेमाला काळिमा फासला आहे हे मात्र नक्की