आफताबची Narco Test आज नाहीच; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट आज होणार नाही. मात्र नार्को टेस्ट घेण्यापूर्वी, अनेक चाचण्या करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फॉरेन्सिक सायकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पुनीत पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. पण कोर्टाने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. या परवानग्या मिळण्यासाठी १० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परंतु एकदा परवानगी मिळाल्यावर, बाकी सर्व काही 10 दिवसांत केले जाईल अशी माहिती डॉ. पुनीत पुरी यांनी दिली आहे. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट आज होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दिल्ली न्यायालयाने १७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात शहर पोलिसांना पाच दिवसांत नार्को टेस्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, तसेच आफताब वर ‘थर्ड डिग्री’ वापरता येणार नाही, असेही कोर्टाने म्हंटल होत. नार्को टेस्टमध्ये आफताबला जवळपास ५० हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यादरम्यान आफताबला त्याचे करिअर आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील.