23 वर्षांनी भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये रचला ‘हा’ इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women’s team) 23 वर्षांनी इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 143 धावा आणि जलदगती गोलंदाज रेणूका सिंह ठाकूरच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women’s team) बुधवारी सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 88 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या अगोदरचा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. या दोन विजयाबरोबर भारताने मालिकासुद्धा जिंकली आहे.

भारतीय महिला क्रिकेट (Indian women’s team) संघाने 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 मध्ये इंग्लंडमध्ये मालिका जिंकली होती. इंग्लंडच्या संघानं सामन्यात टॉस जिंकत पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय खेळाडूंच्या तुफान फटकेबाजीने त्यांच्यासमोर 333 धावांचे आव्हान उभे करण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 245 धावांवर आउट झाला. आणि भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला

या सामन्यात इंग्लंडच्या टीमकडून डॅनिअल व्याटनं सर्वाधिक 65 धावा केल्या. एलिसे केप्ली आणि एमी जोन्सनं 39-39 धावा केल्या. भारतीय संघाकडून रेणूकाच्या चार विकेट्सशिवाय दीप्ती शर्मा आणि डी हेमलता यांना एक एक विकेट घेण्यात यश आले. भारतीय संघाला (Indian women’s team) इथवर पोहोचवण्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचा मोलाचा वाटा आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!