मोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का : आ. शंभूराज देसाई यांची 60 वर्षानंतर एकहाती सत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी जवळपास पावणेतीनशे मतांनी विजय मिळवला आहे. तर घाणव ग्रामपंचायत पाटणकर गटाने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीत 1-1 अशी बरोबरी झाली. परंतु सत्तांतरामुळे पाटणकर गटाला धक्का बसला.

मोरगिरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात तब्बल 60 वर्षे सत्तेत होती. अखेर या मोरगिरी विभागातील अत्यंत महत्वाची असणाऱ्या ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या गटाने धक्का देत मोठे खिंडार पाडले. मोरगिरी ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 258 मतदारांपैकी 985 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होती. घाणव येथे 532 मतदारापैकी 365 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

मोरगिरी ग्रामपंचायतीत निवडूण आलेले नवनिर्वाचित उमेदवार पुढीलप्रमाणे ः- सचिन कृष्णाजी मोरे, सरीता कृष्णत कुंभार, वैशाली सचिन मोरे, संदीप गजानन सुतार, सुनिता सुरेश गुरव, जगन्नाथ परशराम माने, निर्मला रावसाहेब चव्हाण यांचा समावेश आहे.