विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिससाठी जाता येणार थेट ‘या’ देशांमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये जाता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने नॅशनल मेडिकल कमिशनला परवानगी दिली आहे. ही परवानगी दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी लागू असेल. ज्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया , कॅनडा या देशांमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल. तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना देखील भारतीय वैद्यकीय कॉलेजमध्ये येऊन प्रशिक्षण घेता येईल.

706 मेडिकल कॉलेजला मान्यताप्राप्त

जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशनने भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनला दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी दर्जा प्रदान केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ही मान्यता भारताच्या सर्व 706 मेडिकल कॉलेजेसला लागू आहे. तसेच भारतात जे नवीन मेडिकल कॉलेज सुरू होतील त्यांना आपोआप WFME ची मान्यता मिळेल. त्यामुळे पुढील दहा वर्षांसाठी मेडिकल कॉलेजला आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल.

वैद्यकीय शिक्षणाचा स्तर उंचावणार

जागतिक फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने परवानगी दिल्यामुळे याचा लाभ जास्त करून भारतीय विद्यार्थ्यांना घेता येईल. भारतीय मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि डॉक्टर्सला जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा स्तर उंचावणार आहे. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल. इतकेच नव्हे तर भारतात परदेशातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी येता येईल. त्यांना इथल्या डिग्रीवर बाहेरील देशात काम करता येईल.

दरम्यान भारतात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जास्त प्रमाणात विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या देशांमध्ये कामाच्या शोधात जात आहेत. परंतु सरकारी धोरणानुसार भारतीय वैद्यकीय कॉलेजेस मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी देशातील ग्रामीण भागात जाऊन काही वर्षे सेवा देणं बंधनकारक आहे. त्यांचा हा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील गोष्टी करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.