व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. अशात आता नव्याने आलेल्या सुपरबग या मायकोप्लासमा जेनिटेलियम जिवाणूंमुळे अनेकांची चिंता वाढवली आहे. अमेरिकेत मानवांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबग विषाणूमुळे धोका वाढला असून त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत ‘सुपरबग’चा हाहाकार

अमेरिका सारख्या प्रगत देशात काही दिवसांपासून सुपरबग जिवाणूचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढत आहे. या जिवाणूंमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. लॅन्सेट या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार, सुपरबग जिवाणू जर झपाट्याने पसरत राहिला तर दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

औषधांचा कोणताही परिणाम होत नाही

अमेरिकेत पसरणाऱ्या सुपरबगची दाहकता इतकी आहे कि त्याची कल्पना देखील करता येणार नाही. जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू या विषाणूमुळे होत आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबग्सवर परिणाम करत नाहीत, असे लॅन्सेटच्या संशोधनातून समोर आले आहे. हा सुपरबग जगासाठी नवीन प्रकारचा धोका निर्माण करत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सुपरबग म्हणजे नक्की आहे तरी काय?

सुपरबग या नावाचा अर्थ त्यामागील करणे नक्की आहे तरी काय असा प्रश्न पडतो. सुपरबग हा रुग्णाच्या शरीरात असलेले जीवाणू, विषाणू आणि परजीवी ज्यांच्यावर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत. सुपरबग हा जीवाणूंचा एक प्रकार आहे. काही जीवाणू मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. सुपरबग मानवांसाठी घातक आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी हे काळानुसार बदलतात, तेव्हा औषधांचा त्यांच्यावरील परिणाम कमी होते. त्यांच्यामध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. त्यामुळे संसर्गावर उपचार करणे खूप कठीण होते.

कशा प्रकारे पसरतो सुपरबग?

सुपरबाग हा नेमका कशा प्रकारे पसरतो असा प्रश्न पडला असेल तर त्यामागील उत्तर आहे की, हा त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबग्सवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही, पण योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास याचा धोका टाळता येऊ शकते.