कोरोनानंतर धोक्याची नवी घंटा; ‘या’ शहरात आढळला Zombie Virus

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zombie Virus हे नाव आपण हॉलिवूड मधील चित्रपटात ऐकले असेल. त्यांच्यामुळे काय होते हेही चित्रपटातून पहिले असेल. जर हा व्हायरस प्रत्यक्षात आला तर? आणि हा व्हायरस पुन्हा माणसाला लागला तर? असा विचार जरी केल्यास आपल्याला घाम फुटल्याशिवाय आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नुकतेच कोरोना सारखं संकट दूर झाल्यावर आता कुठे सर्वकाही सुरळीत सुरू झाले असताना आता आणखी एक नवा व्हायरस समोर आला आहे. शास्त्रज्ञांना तब्बल 48 हजार वर्षे जुना झोम्बी व्हायरस रशियातील एका तलावात आढळून आला असून तो खूपच धोकादायक आहे.

कोरोनाहून अतिशय भयंकर असलेल्या झोम्बी व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हायरस रशियातील एका तलावात आढळला असून ही जगभरासाठी एक धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे. झॉम्बी व्हायरसचा धोका इतका आहे की, तो लहान-लहान पेशी असलेल्या जीवांना सुद्धा संक्रमित करू शकतो.कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरात बसला.

या महामारीनंतर आता साथीचे आजार पसरवणाऱ्या विषाणूंचा शोध घेण्यात येत आहे. भारतासारखे देश अशा प्रकारच्या व्हायरसचा सामना करण्यास सक्षम आहेत. मात्र, झोम्बी व्हायरसचा धोका नेमका किती आहे हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु अशा व्हायरस किंवा साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्टेजवर तयार राहणे आवश्यक आहे.

zombi deer

हरणांमध्ये पसरला होता Zombie Virus

2018 मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या काही भागांमध्ये हरणांमध्ये क्रोनिक वेस्टिंग डिसीज पसरला होता. या आजाराला झॉम्बी डियर डिजीज देखील म्हटले जाते. हा आजार अमेरिकेच्या 22 राज्यात आणि कॅनडाच्या 2 राज्यातील हरणांमध्ये पसरला होता.

zombi virus

काय होतो परिणाम?

तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस हरणांचा मेंदू, पाठीचा कणा आणि अनेक पेशींवर हल्ला करते. तसेच यामुळे प्राण्यांचे वजन अचानक कमी होते. मानसिक संतुलन बिघडते. ते खूप चिडतात आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो. मनुष्याला या व्हायरसची लागण केवळ प्राण्याचे मांस खाल्ल्याने नाही तर त्यांची लघवी, लाळ, थुंकी यांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो. मनुष्याला या व्हायरसची लागण झाल्यास डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्याची लक्षणे दिसू शकतात. अद्याप सुर्दैवाने मनुष्यांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला नाही.

झोम्बी व्हायरस

Zombie Virus आहे तरी काय?

रशियातील एका तलावात 48,500 वर्षे जुना हा झोम्बी व्हायरस पुरलेला होता. शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नाव पंडोराव्हायरस एडिमा (Pandoravirus Yedoma) असे ठेवले आहे. कारण रशियातील युकेची अलास सरोवराच्या तळाशी शास्त्रज्ञांना पँडोराव्हायरस सापडला. तर इतर व्हायरस मॅमथच्या फर किंवा सायबेरियन लांडग्याच्या आतड्यांमध्ये सापडले आहेत.