याला म्हणायचं ‘प्रो बॉस’ …! टार्गेट पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना गिफ़्ट केली चक्कं SUV

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुजरातमधील उद्योगपतींचे मोठ्या दिलाचे किस्से तुम्ही ऐकले असतील, पण या वेळी ‘केके ज्वेलर्स’ने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटीमुळे संपूर्ण व्यापारी जगतात चर्चा रंगली आहे. केवळ 12 कर्मचाऱ्यांसह सुरू झालेली कंपनी आज 200 कोटींच्या टप्प्यावर पोहोचली, आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद मालक कैलाश काबरा यांनी अशा पद्धतीने साजरा केला की, तो कायम लक्षात राहील!

200 कोटींचे लक्ष्य पूर्ण, थेट एसयूव्ही गिफ्ट

खेडा जिल्ह्यातील केके ज्वेलर्स कंपनीने 2006 मध्ये आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. सुरुवातीला अवघ्या 2 कोटींच्या टर्नओव्हरवर सुरू झालेली ही कंपनी आता 200 कोटींच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या यशामागे कंपनीतील कर्मचाऱ्यांची मेहनत आहे, हे लक्षात घेऊन दोन्ही भावांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला कंपनीतील कर्मचाऱ्यांना महागड्या कार गिफ्ट करण्याचा.

स्वतःसाठी नव्हे, तर टीमसाठी लक्झरी कार

कोणतीही मोठी कंपनी आपल्या टॉप मॅनेजमेंटसाठी बोनस किंवा इन्सेन्टिव्ह देते, पण केके ज्वेलर्सने वेगळ्या प्रकारे कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. सुरुवातीपासून कंपनीसोबत असलेल्या वरिष्ठ 12 कर्मचाऱ्यांना त्यांनी एसयूव्ही कार गिफ्ट केल्या. यात महिंद्रा XUV 700, टोयोटा इनोव्हा, हुंडाई i10, हुंडाई एक्स्टर, मारुती सुजुकी एर्टिगा आणि मारुती सुजुकी ब्रेझा यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

कंपनीचे संस्थापक कैलाश काबरा म्हणाले, “हे यश माझे एकटे नाही, तर संपूर्ण टीमचे आहे. त्यामुळे ही सेलिब्रेशन माझ्यासाठी नव्हे, तर माझ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. मी स्वतःसाठी नाही, तर माझ्या मेहनतीने कंपनी उभी करणाऱ्या टीमसाठी हे गिफ्ट दिले आहेत.”

स्टार्टअप ते 200 कोटींचा टप्पा

केके ज्वेलर्सने 19 वर्षांत जबरदस्त वाढ केली आहे. सुरुवातीला 12 कर्मचाऱ्यांसह सुरू झालेली ही कंपनी आज 140 कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहे. गेल्या वर्षी 170 कोटींचा टर्नओव्हर गाठल्यानंतर यंदा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. कंपनी आता आयपीओ लिस्टेड आहे आणि आगामी काळात आणखी मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. या अनोख्या सेलिब्रेशनमुळे केके ज्वेलर्सने उद्योगविश्वात नवा आदर्श उभा केला आहे. कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘परिवार’ समजून केलेला हा सन्मान इतर कंपन्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.