Satara News : पुसेसावळीच्या दंगलीनंतर साताऱ्यात निघाला मुकमोर्चा; जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दंगलीच्या घडलेल्या प्रकारानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 48 तासाकरीता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आज सर्व धर्मीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवला होता.

साताऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील खबरदारीची भूमिका घेतली असून सातारा शहर आणि जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि प्रशासन सतर्क असून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलीस कुमक मागवून ती तैनात करण्यात आलेली आहे.

अजूनही सातारा शहरातील इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यामुळे बँकिंग व्यवहार तसेच अनेक कार्यालयांचे व्यवहार ठप्प आहेत. शाळा, महाविद्यालय सुरू असली तरी पालकांनी आपल्या जबाबदारी वर विद्यार्थ्यांना सोडावे आणि आणावे असे आवाहन शाळांच्या वतीने देखील करण्यात आले आहे.