ऑटोग्राफ दिल्यानंतर लाडक्या धोनीने चाहत्याकडे मागितली ‘ही’ खास गोष्ट; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या दोन्ही अमेरिकेमध्ये आपल्या लाडक्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र यावेळी भारतात महेंद्रसिंह धोनीचा एक गोड असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला प्रत्येकजण आपल्या अकाउंटवरून शेअर करत आहे. तसेच, या व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम दिले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत धोनी आपल्या चाहत्याकडे चॉकलेट मागताना दिसत आहे. त्यामुळेच आता लाडक्या धोनीला चॉकलेट किती आवडते हे सर्वांना समजले आहे.

आपल्या चाहत्यांकडे चॉकलेट मागतानाचा धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला धोनी मिनी बॅट्वर ऑटोग्राफ देत आहे. यानंतर ऑटोग्राफ केल्यानंतर स्वतः दोन्ही चाहत्याकडून चॉकलेट बॉक्स मागून घेतो. ऑटोग्राफ देण्यापूर्वी हाच बॉक्स दोन्हीने आपल्या चाहत्याकडे दिला होता. आपला चॉकलेटचा बॉक्स मागताना दोन्ही म्हणतो की, “चल आता चॉकलेट परत दे”. यानंतर तो चाहता देखील हातातला बॉक्स धोनीला देऊन टाकतो.

महेंद्रसिंह धोनीचा चॉकलेट मागताना हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. या व्हिडिओतून दिसत आहे की दोन्हीला चॉकलेट खायला किती आवडते. सध्या दोन्हीचे चाहते त्याचा हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून शेअर करत आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर खास कमेंट केल्या आहेत. काहींनी तर म्हटले आहे की, दोन्ही तुला एवढे चॉकलेट आवडते तर आम्ही तुला आणून देतो. दरम्यान, धोनीच्या या व्हिडिओला लखोंपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत.