उद्धव ठाकरेंवर नवे संकट येणार!! शिवसेना पक्षानंतर मशाल चिन्हही हातातून जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निकाल काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे याचा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालाला आवाहन करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे टेन्शन आणखीन एक बातमी समोर आली आहे.

शिवसेना पक्ष हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाचे मशाल चिन्हही धोक्यात आले आहे. कारण, या चिन्हावर दावा करत समता पक्षाने पुन्हा एकदा आक्रमकाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे गटारा निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच या चिन्हासाठी ते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे देखील सांगितले आहे.

मुख्य म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये समता पक्ष मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे मोठी माहिती मंडल यांनी दिली आहे. तसेच यावेळी जर आयोगाने आम्हाला दात दिली नाही तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मंडल यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या अडचणीत आईन निवडणुकीच्या काळात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टामुळे त्यांना हे चिन्ह पुढे देखील मिळाले. मात्र मशाल हे मूळ चिन्ह समता पक्षाचे आहे. मशाल चिन्ह समता पक्षाची ओळख आहे. सध्या उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत आहेत.

उदय मंडल यांनी ठाकरे गटाला दिलेल्या इशारामुळे आता या संदर्भात ठाकरे गट काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वी राहून नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यामुळे याचा देखील फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे. आता जे मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे होते, ते देखील हातात जाणार असल्याचे दिसत आहे.