BREAKING : अफजल खानाच्या कबरीच्या शेजारील उदात्तीकरण हटवलं; सरकारची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
अफजल खानच्या कबरी शेजारील उदात्तीकरण हटवण्याची कारवाई आज पहाटे राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी शेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात आले होते. आज पहाटे शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझलखान कबरी लगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे. प्रशासनाच्या वतीने कबरीशेजारील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अफजल खान कबरी लगतचा अनधिकृत बांधकामाचा वाद सुरू होता. आज राज्य सरकारने यावर कारवाईची बडगा उचलला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/3289265277995996

जेसीबी, पोकलेन अफजलखान कबरी लगतच्या परिसरात आज भल्या पहाटे दाखल झाले आहेत. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इतिहासाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड येथील गेले वीस वर्ष वादाच्या भवरात असलेली अफजल खान कबर येथील काही मुस्लिम संघटनेने करण्यात आलेल्या उदातीकरण काढण्यात यावे अशी अशी मागणी करण्यात येत होती. वीस वर्षे पर्यंत असलेला अफजल खान कबर उदातीकरण हटवण्याचा निर्णय आज राज्य शासन ना कडून घेण्यात येत आहे.